Sunday, May 28, 2017

माझी नर्मदा परिक्रमा २०१६-१७ :8















।। नर्मदे हर ।। ।। नर्मदे हर ।।
           डिण्डोरी तसे शहर नार्मदेच्या काठावर वसलेले दोन्ही बाजूला आश्रम आहेत मंदिरे आहेत महाराष्ट्रातील नाशिक तीर्थक्षेत्रासरखे खूप यात्रेकरु येथे येतात. त्यमागे भिक्षा मागनारेही आलेच व् मनुष्य स्वभावही स्वतः ला स्वच्छ ठेवून सर्व परिसर गलिच्छ करतात, अस्वच्छते मुळे जीवनातला आनंद निघुन जातो. फार वाईट वाटले, ज्या नर्मदामातेला सर्व सुखांसाठी मनुष्य प्रार्थना, नवस बोलतो तोच तिच्या पात्रात घाण करताना थोडाही विचार करीत नाही. भारतात सर्व नद्यांची अवस्था अशीच केलीय  माणसाने, किती दुर्दैव हे. आज शुद्ध जल मिळत नाही व जे शुद्ध म्हटले जाते त्याचा तसा काही भरवसा नाही. संधिसाधुनी ह्याच फायदा घेऊन अब्जावधी  डॉलार्स कमवायला  सुरुवात केलीय. शुद्ध जलस्रोतांवरचा विश्वास मनुष्य घलावून बसला. आम्ही मात्र शुद्ध नर्मदा जल खूप-खूप प्यायलो. मनसोक्त आनंद घेतला प्रत्येक घाटावर व नर्मदेच्या किणाऱ्यावर आनंद घेतला.        
       आज प्रवास रस्त्या रसत्याने होता, लोकसंख्या विरळ असल्याने रहदारी फारशी नव्हती, सलैया, रहंगी, इमलइ, हराटोला, गिद्ध, लौंडी, चावी, खलेडिठौरी, गुप्तगंगा, मोहगांव फाटा, रेहगाव, सालीवाड़ा, असा प्रवास करुन देवगांव येथे सायंकाळी 7.00 पोहोचलो. देवगाव ला जमदग्नि ऋषी च्या नावाचा खूप जूना आश्रम आहे, नार्मदाकिनारीच आश्रम आहे, पूर्वेकड़ून बुद्धिमा नदी येथे येवून मिळते, संगमाचे दृश्य अतिशय विलोभनिय आहे, शहरवासी अश्या निसर्गाला मुकलेत.
नर्मदा स्नानाच आनंद घेताना

बुढी मॉ नदी, समोर टेकडीवर जमदग्नी आश्राम

जमदग्नी आश्राम घाट

जमदग्नी आश्राम, व परशुराम तपोभूमी


Saturday, May 20, 2017

माझी नर्मदा परिक्रमा २०१६-१७ :7














नर्मदे हर ! ! ! नर्मदे हर ! ! ! 
माधवपुर ते डिण्डोरी (मध्यप्रदेश) ह्या प्रवासत एक गोष्ट घडत होती ती म्हणजे नित्यनियमने सकाळी 3:45 ला उठणे सर्व च परिक्रमावासी लवकरच उठतात. आपली नित्यकर्म उरकुन आपपले पुढील प्रवसाला निघातत, कुणीही कुणासाठी थांबत नाही. मझाही असाच एकला चालोरे प्रवास सुरु झाला. आज माला डिण्डोरी गाठावयाचे होते. अंतर लाम्बचे होते परंतु रस्ता डांबरी होता, एक नार्मदाभक्तने नर्मदे हर केले, व् चहा साठी विनंती केली, चहा घेतला व् पुढे निघलो, 10.30 मोहतरा ह्या गावी पोहोचलो. आशीष भोजनालायाच्या मालाकाने दूध व् भजी, नाश्ता दिला, परिक्रमवासींच्या बद्दल खूप आदर व् श्रद्धा त्यांच्यात दिसते, खूप आदराने सेवा करतात, मनात असे भाव येतात की तेच परिक्रमेला निघालेत. परिक्रमेला निघलो ते एका श्रद्धेने, कोणताही नवास नव्हता, मनोकामना नव्हती, ऐकले होते, वाचले होते, व जो अभ्यास करतोय त्याची अनुभूती घ्यायची होती.जगाचाहि अनुभव घेत होतोच, नवख्या प्रदेशात, अनोळखी माणसांच्यात इतका आदर-भाव बघून माँ नार्मदेच्या कृपेची जाणीव होत होती. विचारांच्या श्रृंखलेत व नाम स्मरण करीत करीत कुकरामठ येथे पोहोचलो, ऋणमुक्तेश्वराचे दर्शन घेतले, व पुढे निघालो, 5:45 ला रामबाई यांच्या आश्रमात डिण्डोरी ला पोहोचलो, आपल्या बाळाला उशीर झाल्यावर आई जशी कासवीस होते व् ते बाळ तिला दीसताच जो आनंद तीला होतो ते आनंदाश्रु मी त्या माताजींच्या डोळ्यात पाहिलेत आश्रमच्या दारात थांबून परिक्रमवासीची वाट त्या पहात होत्या, परिक्रमावासी नाही आलेतर उपवास असे व्रत जवळ जवळ सर्वच आश्रमवासी ठेवतात, वय वर्ष 75 असलेल्या माताजिनी स्वागत केले आसनाची व्यवस्था केली व स्वतः चहा घेऊन आल्यात. आई ही आईच असते ती कुणीही असो ह्याची अनुभूती घेत माझेहि डोळे नकळत पनवालेत, त्या मातेच्या आठवाणीने जी मला खूप लवकर सोडून गेली. हिच्या रुपात माला साक्षात तीच भेटली. खूप प्रेम तिने माला दिले दोन दिवस मला थाम्बवून घेतले, प्रवासाने मीहि थकालो होतो. तेथून निघतांना डब्यात पूरी भाजी दिली.

ऋणमुक्तेश्वर मंदिर, कुकरा मठ
ऋणमुक्तेश्वर मंदिर पुरातत्वविभाग, कुकरा मठ
नर्मदा नदी दिंडोरी, मध्यप्रदेश 

नर्मदा नदी दिंडोरी, मध्यप्रदेश 

माताजी रामबाई,  दिंडोरी आश्रम,  दिंडोरी,  मध्यप्रदेश 

भगवान महावीर, ऋणमुक्तेश्वर मंदिर, कुकरा मठ

Monday, May 8, 2017

माझी नर्मदा परिक्रमा २०१६-१७ : 6

















!! नर्मदे हर ! !    !! नर्मदे हर ! !    !! नर्मदे हर ! !
 बंजारटोला ते गोरखपुर ते माधवपुर प्रवास डांबरी रस्त्याने होता. वाटेत एक हॉटेल मलाकाने चहा साठी बोलावले चहा घेऊन पुढे निघालो. नर्मदामाई येथून 5 ते 7 की.मी. दूर रहते, दुपारी 12.00 गोरखपुरला शिवमंदिरात दर्शन घेऊन 1.30 ला माधवपुरला पोहोचलो. आज दुपाराचे जेवण एक सफरचंद व पार्ले बिस्किट्स प्रसादात मिळाली होती, आश्रमात माताजींना रात्रीच्या भोजनाचे सांगितले, महाराजजी आटा नही है, तो दाल चाँवल चलेगा क्या? त्यांनीच  विनंती केली. बघा मी तेथे याचक व ते दाता परन्तु विनंती ते करीत होते. खूप वेगळा अनुभव कधीही कहिहि मगिताले नाही. अश्या जीवनाचा अनुभव नाही. श्रद्धा व् विश्वास अजुन दृढ़ झाला. थंडी खूप होती, माताजींना झोपण्याची व्यवस्था केली पांघरुन् दिले. परिक्रमेतील अनुभव्- देण्याची भावना अत्यन्त हलाकितही भक्ताला संपूर्ण मदत मिळते, जय नर्मदे माता !!!

 मनोहारी वाटणार पण कष्टदायक  शेतकरी राजाचं जगण

राम्माताजीच्यासोबत मी स्वत:

कृष्ण काळाची आठवण मला ह्या दृश्यांनी सततच होत असे 

सरसोच बहरलेले शेत 

 दर्शन नर्मदा मतेच 

मनोहारी वाटणार पण कष्टदायक  शेतकरी राजाचं जगण



Thursday, May 4, 2017

माझी नर्मदा परिक्रमा २०१६-१७ : 5

















नर्मदे हर ! ! ! नर्मदे हर ! ! !
 मेढाखार ते बंजारटोला कडाक्याच्या थंडितही नार्मदेचा प्रवाह गरम असतो. काठा काठा ने प्रवास खुपच आनंददायी पैन खड़तर आहे,वाटेत करमंडल नदीचा संगम आहे संगम पार करून बंजारटोला ह्या गावी धर्मशालेत पोहोचलो, सोबत मेढाखार च्या भगवान प्रसाद तिवरिंचे मित्र स्वामी रामेशानंद होते त्यांनी परिक्रमेचे अनुभव व् स्वतः चा जीवन प्रवास कथन केले मन आनंदी होते संत संग व् सत्संग लाभला होता, भाग्य.





Wednesday, May 3, 2017

माझी नर्मदा परिक्रमा २०१६-१७ : ४
















        अरण्डी आश्रमात मुक्काम होता, दैनंदिनी साधारण अशी होती सकाळी 3:45 ते 5:00 ध्यान धारणा, 5: 00 ते 6:00 प्रात:विधि, स्नान, स्नान नार्मदेवर जावून नार्मदेच्या काठावर गुढाघाभर पाण्यात जावून 5 डुबक्या घेणे, जेथे नर्मदा खुप लांब आहे तेथे हात पम्पावार अथवा विहीरिवर स्नान करीत असे. 6:00 ते 6:45 पूजा त्यानंतर चहा, चहा शक्यतो बिन- दूधाचा, खुप-खुप साखरेचा व् आयुर्वेदिक असे. कधी-कधी बाल -भोग (नाश्ता) मिळत असे. साधारण 7:15 ते 7:30 पर्यन्त पुढील प्रवास सुरु होई. आजचा प्रवास अरण्डी ते कबीर चौथरा, करंजिया, मेढाखार असा होता.संबंध रस्ता घनदाट जंगलातून होता मी एकटाच प्रवास करीत होतो मनात भीतीही वाटत होती आजचा प्रवसाचा दूसरा दिवस होता नवखा प्रदेश,भाषा वेगळी, पटकन समजत नव्हती, साधारण 9:30 ला काबिरचौथर्याला पोहोचलो दाट जंगलात कबिरांची कुटिया आहे व् एक अतिशय जुने व खुप मोठे वाडाचे झाड़ आहे त्याखाली कबिरांनी काही काळ साधना केली होती. आजही तेथे कबिरांचे वंशज तेथे राहतात. कबिरांची साधना बघून नार्मदामैया त्याना भेटायला येथे जंगलात आलेली आहे. येथे भेट देऊन पुढील प्रवास सुरु केला आता सोबत बरीच वानरे व् माकड होती, हिराव्यागर वनातून जाताना भीतिबरोबर सुखवाह ही वाटत होते. प्रथमच काही परिक्रमावासी रसत्याने चालताना भेटले, आई, वडील व मुलगा परिक्रमेला निघलेले, नार्मदेहर झाले त्यांच्याबरोबर चहा घेतला व् पुढे निघालोे 80,82 वर्षाच्या गृहस्थाने नार्मदेहर केले व् सोबत चालू लागले त्यांचा पोशाख पाहून मनात शंका डोकावून गेली, की योग्य व्यक्ति नाही. गप्पाच्या ओघात त्यानी त्यांच्या घरी आजच्या मुक्कमाचे निमंत्रण दिले, शंकेपोटी लगेच नकार दिला, पुढे गप्पातुंन जानवाले की त्यांचा शास्त्रांचा अभ्यास झालेला आहे, त्यांची माफ़ी मागून त्यांचे निमंत्रण स्विकारले, पुढे प्रवासत बऱ्याच गप्पा झाल्या,4:30 ला त्यांच्या घरी मेडाखारला पोहोचलो,

मेढाखारची नर्मदा किनाऱ्याची सकाळ, 

नर्मदा मातेचे लहान स्वरूप, मेढाखार

आरंडी आश्राम ते कबीर चौथरा जंगलातून रस्ता  

कबीर चौथरा येथील कबीर बड, वडाचे झाड.
 ज्याच्या खाली बसून कबीरांनी तपस्या केली होती.

मेढाखारला नर्मदा किनारी असलेला एका मोठा पाषाण,
नर्मदेला कितीही पूर आला तरीही अनादिकालापासून तसाच जागेवर आहे.

मेढाखारच्या पुढे असलेला नर्मदा व आरंडी नदीचा  संगम 


नर्मदा किनारी ध्यानावस्थेत असलेला साधक

गुलबकावलीचे फुल, कबीर चौथरा 

कबीर चौथरा येथील कबिरांचे वंशज शेजारी नर्मदा कुंड.

मेढाखारचे  श्री. तिवारी त्यांची पत्नी, व पुतण्या,
सोबत त्यांचे परम मित्र स्वामी रामेशानंद  

नर्मदा किनाऱ्यावरील आश्राम मेढाखार 

नर्मदा कुंड कबीर चौथरा 

गुलबकावली 

Monday, May 1, 2017

माझी नर्मदा परिक्रमा २०१६-१७ : ३




प्रवसाचा पहिला दिवस दक्षिण काठाने माझा प्रवास सुरु झाला. पूर्वेकड़ून पश्चिमेकड़े, अमरकंटक ते विमलेश्वर साधारण 1600 कि.मी. दुपारी 12.30 ला नार्मदामाईच्या उगमस्थानवर अमरकंटक येथे संकल्प केला. प्रार्थना- पूजा केली व 2.30 ला प्रस्थान केले. अरण्डी आश्रमात पोहोचलो प्रवसातले काही दृश्य, अरण्डी आश्रम व् नर्मदा परिसर.









माझी नर्मदा परिक्रमा २०१६-१७ :8

।। नर्मदे हर ।। ।। नर्मदे हर ।।            डिण्डोरी तसे शहर नार्मदेच्या काठावर वसलेले दोन्ही बाजूला आश्रम आहेत मंदिरे आह...