Saturday, May 20, 2017

माझी नर्मदा परिक्रमा २०१६-१७ :7














नर्मदे हर ! ! ! नर्मदे हर ! ! ! 
माधवपुर ते डिण्डोरी (मध्यप्रदेश) ह्या प्रवासत एक गोष्ट घडत होती ती म्हणजे नित्यनियमने सकाळी 3:45 ला उठणे सर्व च परिक्रमावासी लवकरच उठतात. आपली नित्यकर्म उरकुन आपपले पुढील प्रवसाला निघातत, कुणीही कुणासाठी थांबत नाही. मझाही असाच एकला चालोरे प्रवास सुरु झाला. आज माला डिण्डोरी गाठावयाचे होते. अंतर लाम्बचे होते परंतु रस्ता डांबरी होता, एक नार्मदाभक्तने नर्मदे हर केले, व् चहा साठी विनंती केली, चहा घेतला व् पुढे निघलो, 10.30 मोहतरा ह्या गावी पोहोचलो. आशीष भोजनालायाच्या मालाकाने दूध व् भजी, नाश्ता दिला, परिक्रमवासींच्या बद्दल खूप आदर व् श्रद्धा त्यांच्यात दिसते, खूप आदराने सेवा करतात, मनात असे भाव येतात की तेच परिक्रमेला निघालेत. परिक्रमेला निघलो ते एका श्रद्धेने, कोणताही नवास नव्हता, मनोकामना नव्हती, ऐकले होते, वाचले होते, व जो अभ्यास करतोय त्याची अनुभूती घ्यायची होती.जगाचाहि अनुभव घेत होतोच, नवख्या प्रदेशात, अनोळखी माणसांच्यात इतका आदर-भाव बघून माँ नार्मदेच्या कृपेची जाणीव होत होती. विचारांच्या श्रृंखलेत व नाम स्मरण करीत करीत कुकरामठ येथे पोहोचलो, ऋणमुक्तेश्वराचे दर्शन घेतले, व पुढे निघालो, 5:45 ला रामबाई यांच्या आश्रमात डिण्डोरी ला पोहोचलो, आपल्या बाळाला उशीर झाल्यावर आई जशी कासवीस होते व् ते बाळ तिला दीसताच जो आनंद तीला होतो ते आनंदाश्रु मी त्या माताजींच्या डोळ्यात पाहिलेत आश्रमच्या दारात थांबून परिक्रमवासीची वाट त्या पहात होत्या, परिक्रमावासी नाही आलेतर उपवास असे व्रत जवळ जवळ सर्वच आश्रमवासी ठेवतात, वय वर्ष 75 असलेल्या माताजिनी स्वागत केले आसनाची व्यवस्था केली व स्वतः चहा घेऊन आल्यात. आई ही आईच असते ती कुणीही असो ह्याची अनुभूती घेत माझेहि डोळे नकळत पनवालेत, त्या मातेच्या आठवाणीने जी मला खूप लवकर सोडून गेली. हिच्या रुपात माला साक्षात तीच भेटली. खूप प्रेम तिने माला दिले दोन दिवस मला थाम्बवून घेतले, प्रवासाने मीहि थकालो होतो. तेथून निघतांना डब्यात पूरी भाजी दिली.

ऋणमुक्तेश्वर मंदिर, कुकरा मठ
ऋणमुक्तेश्वर मंदिर पुरातत्वविभाग, कुकरा मठ
नर्मदा नदी दिंडोरी, मध्यप्रदेश 

नर्मदा नदी दिंडोरी, मध्यप्रदेश 

माताजी रामबाई,  दिंडोरी आश्रम,  दिंडोरी,  मध्यप्रदेश 

भगवान महावीर, ऋणमुक्तेश्वर मंदिर, कुकरा मठ

No comments:

Post a Comment

माझी नर्मदा परिक्रमा २०१६-१७ :8

।। नर्मदे हर ।। ।। नर्मदे हर ।।            डिण्डोरी तसे शहर नार्मदेच्या काठावर वसलेले दोन्ही बाजूला आश्रम आहेत मंदिरे आह...